मंगळवार १ एप्रिल २०१४आठवडयाचे भविष्य
मासिक भविष्य
एप्रिल २०१४
ग्रहस्थिती
राशीतून केतूचे, पराक्रमस्थानातून गुरुचे, षष्ठस्थानातून मंगळाचे, सप्तमस्थानातून शनि-राहूचे तर लाभस्थानातून शुक्र-नेपच्यूनचे व व्ययस्थानातून रवि, बुधाचे भ्रमण होत आहे. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. सत्कार्यासाठी प्रवास घडून येतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल. कुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल. आपल्या राशीच्या व्ययस्थानातून रवि-बुधाच्या होणार्‍या भ्रमणमुळे सरकार दरबारी रेंगाळलेली कामे पूर्ण होण्यास विलंब लागेल. अनपेक्षित खर्च उद्भवतील. प्रतिष्ठित व्यकिं्तचे सहकार्य लाभेल. कोणाकडूनही आपले काम होईल अशी अपेक्षा बाळगू नका. स्वत:चे काम स्वत:च करावे. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करायची सवय लागल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागेल. महत्त्वाची आर्थिक कामे पूर्वार्धात पूर्ण करुन घ्यावीत. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील.स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत प्रयत्नशील राहाल. आव्हानात्मक कामे स्वीकाराल. व्यवसाय उद्योगातील अनुत्तरीत प्रश्न सुटतील. सांसारिक जीवनातील रुसवे फुगवे दूर होऊन सहजीवनाचा आनंद घ्याल. पत्नीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आत्मविश्‍वास वाढवणार्‍या घटना घडतील. एखादी गोष्ट आपण निश्‍चित करु शकू हा विश्‍वास वाटेल. विरोधकांवर विजय मिळवाल.भविष्यकाळाच्यादृष्टीने आर्थिक तजवीज करणे सोपे होईल.
लाभस्थानातील रवि-बुधाचे भ्रमण शेअर्स, लॉटरीमधून लाभ देणारे राहील. महिन्य़ाची सुरुवात अनपेक्षित लाभाने झाल्यामुळे आपला आनंद व उत्साह वाढेल. आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. कवी, कलाकार, लेखक, साहित्यिकांना चांगल्या संधी लाभतील. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल, पुरस्कार मिळतील. खेळाडूंना सतत प्रसिद्धाच्या झोतात राहण्याचे योग येतील. जाणीवपूर्वक आपल्या विचारसरणीत केलेल्या अनुकूल बदलामुळे फायदा होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.परदेशी संस्थांशी व्यावसायिक करार केले जातील. आपल्या कर्तृत्वाला झळाळी येणार्‍या घटना घडतील. आप्तस्वकियांच्या गाठीभेटी व परिचय होतील. उत्साह वाढेल. शासकीय कामात यश लाभेल. रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील. करमणुकीच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. हौसेमौजे खातर खर्च केला जाईल. मानसिक स्वास्थ लाभेल. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करु शकाल. अपेक्षित गाठीभेटी झाल्याने किंवा एखादी महत्वाची बातमी समजल्याने उत्साही बनाल. विश्‍वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात घेतील. कामाच्या जबाबदार्‍या वाढतील. स्पर्धात्मक कार्यात आपण आघाडीवर राहणार आहात. व्यावसायिक भाग्य बीजे पेरली जातील.
राशीतून गुरुचे तर लाभातून केतूचे होणार्‍या भ्रमणामुळे धार्मिक - आध्यात्मिक प्रगती साधता येईल. दशमातील रवि-बुध नोकरीत अधिकार देतील. पदोन्नती होईल. व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविता येतील. आशावादी धोरण स्वीकाराल. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. रेंगाळलेली कामे विना सायास मार्गी लागीतल. सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. नवी दिशा सापडेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. सुखस्थानातून होणार्‍या मंगळाच्या भ्रमणामुळे स्थावर मालमत्तेविषयीचे प्रश्न सुटतील. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. घरातील सुखसुविधा वाढवविण्यासाठी इले्नटॉन्निसच्या वस्तूंची खरेदी कराल. भाग्यस्थानातील शुक्रामुळे अंगभूत कलागुणांना वाव मिळेल. लेखक, साहित्यिकांना चांगल्या संधी लाभतील. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. सरकारी नोकरीत असणार्‍या तरुणांना सरकारी वाहन-वास्तूचे योग येतील. मोठय़ा प्रमाणावर व्यवसायातील आर्थिक उलाढाली करताना नवीन उपक्रमांची अंमलबजावणी मात्र तूर्त पुढे ढकलावी. अवाजवी धाडस करण्याचे टाळावे. स्वसंपादीत धनाचा उपभोग घेता येईल. समाधान लाभेल. संशोधनपर अभ्यासक्रमाची पूर्तता होईल. प्रियव्यक्तीच्या सहाय्याने व्यवसायात भरभराट घडवून आणेल.
पराक्रमस्थानातून मंगळाचे, सुखस्थानातून शनि-राहूचे तर अष्टमस्थानातून शुक्र-नेपच्यूनचे व भाग्यस्थानातून रवि, बुधाचे, दशमस्थानातून केतूचे, व्ययस्थानातून गुरुचे भ्रमण होत आहे. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. सत्कार्यासाठी प्रवास घडून येतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. मोठी आर्थिक उलाढाल केली जाईल. व्यवसाय उद्योगात नवीन कल्पना आकार घेतील. आपले ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम कराल. उद्योग व्यापारात नवीन काही प्रकल्प, योजना करण्यास चांगला काळ आहे. अनुकूल घडामोडी घडतील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल.पूर्वनियोजित कामात बदल करावे लागतील. आपल्या कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडताना तारेवरची कसरत होणार आहे. तब्येतीची काळजी घ्या. मानसिक थकवा जाणवेल. प्रलोभनातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता राहते. व्यावसायिक भाग्य बीजे पेरली जातील. नोकरीत आपल्या अधिकार कक्षेत वाढ होईल. व्यावसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. कुटुंबात सुसंवाद साधलात तरच आपला निभाव लागणार आहे. आकर्षक खरेदी कराल. आत्मविश्‍वास वाढवणार्‍या घटना घडतील. एखादी गोष्ट आपण निश्‍चित करु शकू हा विश्‍वास वाटेल.
धनस्थानातून मंगळाचे, पराक्रमस्थानातून शनि-राहूचे तर सप्तमस्थानातून शुक्र-नेपच्यूनचे व अष्टमस्थानातून रवि, बुधाचे, भाग्यस्थानातून केतूचे, लाभस्थानातून गुरुचे भ्रमण होत आहे. आपल्या मतांचा आदर केला जाईल पण आपल्या बोलण्यामुळे कोणीही दुखावणार नाही याची काळजी घ्या. नवीन उपक्रम राबविण्याचे तुर्त पुढे ढकलावे. नवीन व्यावसायिक करार केले तरी त्यांचा अवलंब सध्या टाळावा. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. आध्यात्मिक विषयांवर हातून लिखाण होईल. जोडधंद्यातून लाभ होतील. रचनात्मक कार्यक्रमातून लाभ होतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षा देऊन यश मिळेल. नवनवीन कल्पना आकार घेतील. नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांची ओळखीतून कामे मार्गी लागतील. व्यावसायिक प्रदर्शने भरविता येतील. आपली सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. अष्टमस्थ रवि, बुधामुळे मन सैरभैर होणार्‍या घटना घडतील.कुटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची चिंता वाटेल. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. खोट्या गोष्टी कळल्यामुळे रागाचा पारा उंचावेल. मात्र अविचाराने कोणतेही निर्णय घेऊ नका. अनपेक्षित धनलाभ झाल्याने आश्‍चर्याचा धक्का बसेल. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. व्यवसाय उद्योगातून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा.
आपल्या राशीतून मंगळाचे, धनस्थानातून शनि-राहूचे तर षष्ठस्थानातून शुक्र-नेपच्यूनचे व सप्तमस्थानातून रवि, बुधाचे, अष्टमस्थानातून केतूचे, कर्मस्थानातून गुरुचे भ्रमण होत आहे. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. मात्र यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वत:चे प्रयत्न स्वत:च करावेत. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे. स्वकष्टाचा पैसा मिळेल. तसाच खर्चही वाढेल. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कीराल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत प्रयत्नशील राहाल. अंगी धडाडी येईल. कर्तुत्वशक्ती वाढेल्याने धाडसी कामे कराल. नोकरीत अधिकार व सत्ता वाढेल. आपल्या बुद्घीचातुर्यावर मोठी मजल माराल. रचनात्मक कामातून लाभ होतील. एखाद्या सेवाभावी संस्थेतून किंवा सहकारी संस्थातून काम करता येईल. कवी, कलाकार, लेखक, साहित्यिकांना चांगल्या संधी लाभतील. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल, पुरस्कार मिळतील. खेळाडूंना सतत प्रसिद्धाच्या झोतात राहण्याचे योग येतील. विवाहेच्छुक तरुणांचे परिचयोत्तर विवाह ठरतील. घरात मंगलकार्याची नांदी होईल. तब्येतीची काळजी घ्या. मानसिक थकवा जाणवेल. कामात अडथळे येण्याती शक्यता आहे. प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळा. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.
राशीतून शनि-राहूचे, पंचमस्थानातून शुक्र-नेपच्यूनचे, षष्ठस्थानातून रवि बुधाचे, सप्तमस्थानातून केतूचे,भाग्यस्थानातून गुरुचे व व्ययस्थानातून मंगळाचे भ्रमण होत आहे. आपल्या राशीच्या षष्ठस्थानातून होणारे रवि बुधाचे भ्रमण नवीन उपक्रम राबविण्यात यश येईल. नवीन कार्यारंभ करण्याचा उत्साह निर्माण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. सरकारी कामात योग्य प्रगती होईल. विश्‍वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात घेतील. हितशत्रूंच्या कारवायांना मोठय़ा युक्तीवादाने सामोरे जावे लागेल. मातुल घराण्यासंबंधी जिव्हाळा वाटेल. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. नोकरीत बदल करु इच्छिणार्‍या तरुणांना यशोमार्ग लाभेल. जोडीदाराशी सुसंवाद साधावा लागेल. दैनंदिन जीवनातून विश्रांतीसाठी जरा बदल करण्याची आवश्यकता वाटेल. आपली क्षमता व अर्मयाद कल्पनाशक्तीची आपणांस कल्पना येईल. परदेशातील भावंडांशी सल्लामसलत करुन महत्वाचे निर्णय घेतले जातील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. समोर आलेल्या संधीचा फायदा घ्या. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना मनाजोगे काम मिळेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल.
सुखस्थानातून शुक्र-नेपच्यूनचे व पंचमस्थानातून रवि, बुधाचे, षष्ठस्थानातून केतूचे, अष्टमस्थानाततून गुरुचे, लाभस्थानातून मंगळाचे, व्ययस्थानातून शनि-राहूचे भ्रमण होत आहे. गृहसुशोभिकरणासाठी आकर्षक, शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. कौटुंबिक जबाबदार्‍या स्वीकाराल. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. व्यवसायातील आत्मविश्‍वास व कामाचा वेग वाढेल. जोडधंद्यातून भरपूर काम मिळेल. नवीन करार होतील. व्यापार-व्यवसायात नफा होईल. मात्र तात्पुरत्या स्वरुपात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. चांगल्या व्यक्तींची भेट होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ होतील. मोठी आर्थिक उलाढाल केली जाईल. मित्रपरिवाराबरोबर सुग्रास भोजनाचे योग येतील. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी प्रवेश मिळेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. ज्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येता, अशा लोकांपासून आज लांब रहा. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. तब्येतीची काळजी घ्या. मानसिक थकवा जाणवेल. कामात अडथळे येण्याती शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करावी लागेल. विवाहेच्छुक तरुणांचे परिचयोत्तर विवाह ठरतील. घरात मंगलकार्याची नांदी होईल. समोर आलेल्या संधीचा फायदा घ्या. प्रतिस्पध्र्याची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या अनिश्‍चितता जाणवेल. धाडसी निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
पराक्रमस्थानातून शुक्र-नेपच्यूनचे, सुखस्थानातून रवि, बुधाचे, पंचमातून केतूचे, सप्तमस्थानातून गुरुचे, दशमस्थानातून मंगळाचे तर लाभस्थानातून शनि-राहूचे भ्रमण होत आहे. सहलीचे आयोजन केले जाईल. भावंडसौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. पाहुण्यांच्या स्वागतास सज्ज रहावे लागेल. पूर्वनियोजित कामात बदल करावे लागतील. जोडधंद्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. व्यावसायिक प्रदर्शने भरविता येतील. कौटुंबिक शुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. राह्त्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. प्रवास सुखकर होईल. आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करतील, कामात थोडा बदल केल्याने बरे वाटेल. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या बोलण्याचा चांगला प्रभाव टाकणारा आहे. तरुणांना सुसंधीचा लाभ मिळेल. आपली आजवर रेंगाळलेली कामे प्रतिष्ठित व्यकिं्तच्या सहकार्याने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. नवोदित कलाकारांना सुसंधी लाभतील. सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जनसंपर्कातून चांगला फायदा होईल. महिलांची विवाहकार्यातील मध्यस्थी योग्य व निर्णायक ठरणार आहे. आपल्या इच्छा, अपेक्षा स्वत:च्या काबूत ठेवाव्यात.
धनस्थानातून शुक्र-नेपच्यूनचे, पराक्रमस्थानातून रवि, बुधाचे, चतुर्थातून केतूचे, षष्ठस्थानातून गुरुचे, भाग्यस्थानातून मंगळाचे, दशमस्थानातून शनि-राहूचे भ्रमण होत आहे. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील.गृहसुशोभिकरणासाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. महिलांना बदलाची नितांत गरज भासेल. घरात मंगलकार्याची नांदी होईल. नवीन वास्तूचे योग येतील. मित्रग्रह शुक्राचे धनस्थानातून होणारे भ्रमण आर्थिक भरभराट करणारे राहील. गोड बोलून आपले ध्येय साध्य करण्यात यश येईल. लेखन, साहित्य, कला प्रगट करण्याची संधी लाभेल. भावंडांसाठी काहीसे त्रासदायक ग्रहमान आहे. दिनांक १४ रोजी रवि मेष राशीत प्रवेश करेल. तेथील केतूवरुन होणारे रविचे भ्रमण घरातील वातावरण तप्त करणारे राहील. दिनांक २0 रोजी बुध सुखस्थानात प्रवेश करेल तेव्हा स्थावरासंबंधीचे व्यवहार गती घेतील. अपेक्षित्र पत्रव्यवहार अथवा फोन होतील. आपल्या कर्तृत्त्वाला झळाळी येणार्‍या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान लाभेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत प्रयत्नशील राहाल. सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. आपले अचूक अंदाज व योग्य व्यक्तींकडून मिळणारी मदत यामुळे आपली निकड भागणार आहे. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्यादृष्टीने मोठय़ा प्रमाणावर आर्थिक उलाढाली केल्या जातील. अंधश्रद्धेला बळी पडू नये.
राशीतून शुक्र-नेपच्यूनचे, धनस्थानातून रवि, बुधाचे, पराक्रमस्थानातून केतूचे, पंचमस्थानातून गुरुचे, अष्टमस्थानातून मंगळाचे, भाग्यस्थानातून शनि-राहूचे भ्रमण होत आहे. या महिन्यात शुक्र-शनिचा व बुध-गुरुचा अन्योन्य योग होत आहेत. आपणांस अतिशय अनुकूल अशी ग्रहांची साथ लाभणार आहे, तेव्हा हाती घेतलेल्या कार्यातून यशप्राप्ती होईल. धनलाभ होतील. वाहन-वास्तूचे योग येतील. आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. कवी, कलाकारांसाठी अनेक सुसंधी चालून येतील. महिन्याचा उत्साहवर्धक घटना घडल्याने तरुण-तरुणी आनंदात राहतील. नवीन ओळखी होतील. उंचीवस्त्रालंकारांची खरेदी कराल. उत्तरार्ध कुटुंबातील वडिलधार्‍या व्यक्तींसाटी प्रतिकूल राहील. आपल्याला मताचा समाजात आदर होईल. कामानिमित्त प्रवास घडून येतील. शेजार्‍यांचे सहकार्य लाभेल. योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. कामानिमित्तच्या घडणार्‍या प्रवासात अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. अंध:श्रद्धेला बळी पडू नका. प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळावे. व्यावसायिक वादंग टाळावेत. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. पुढे घडणार्‍या घटनांची आपल्याला चाहूल लागेल. धार्मिक - आध्यात्मिक प्रगती साधता येईल. विद्याथ्यांना उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळेल. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश लाभेल.
राशीतून रवि, बुधाचे, धनस्थानातून केतूचे, सुखस्थानातून गुरुचे, सप्तमस्थानातून मंगळाचे, अष्टमस्थानातून शनि-राहूचे तर व्ययस्थानातून शुक्र-नेपच्यूनचे भ्रमण होत आहे. आपल्या मतांचा आदर केला जाईल. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. उंचीवस्त्रालंकारांची खरेदी कराल. नोकरीत वरिष्ठांकडून आपल्यावर कामाची जबाबदारी सोपविली जाईल. नवीन व्यावसायिक करार घडतील. धाडसी निर्णय घेतले जातील. भागीदारीत व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांनी मात्र सतर्कतेने निर्णय़ घेणो गरजेचे आहे. गृहसुशोभिकरणासाठी आकर्षक वस्तूंची खरेदी केली जाईल. कुटुंबात मंगलकार्याची नांदी होईल. सतत पाहुण्यांची वर्दळ राहील. उत्तरार्धात दिनांक २७ रोजी आपल्या राशीत येणारा शुक्र नवोदित कलाकारांना चांगल्या संधी देणारे राहील. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. आपली कल्पनाशक्ती व क्षमता याचा स्वत:लाच अंदाज आल्यामुळे काम करण्यास हुरुप येईल. आपल्या कामाच्या पूर्ततेसाठी दुसर्‍यांवर अवलंबून राहू नका. परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. भावाबहिणींशी वागताना भावनिक उद्रेक होणार नाही याची दक्षता घ्या. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्यता आहे. मित्रपरिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद घ्याल. गुंतवणूकीतून लाभ होतील. यंत्र-शस्त्रापासून धोका संभवतो.