शनिवार १२ एप्रिल २०१४आठवडयाचे भविष्य
मासिक भविष्य
१३ एप्रिल ते १९ एप्रिल २0१४
ग्रहस्थिती
आपल्या राशीच्या षष्ठस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण नवीन उपक्रम राबविण्यात यश येईल.महत्वाचे निर्णयात योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन लाभेल. नोकरीत बदल करु इच्छिणार्‍या तरुणांना यशोमार्ग लाभेल. जोडीदाराशी सुसंवाद साधावा लागेल. दैनंदिन जीवनातून विश्रांतीसाठी जरा बदल करण्याची आवश्यकता वाटेल. आपली क्षमता व अर्मयाद कल्पनाशक्तीची आपणांस कल्पना येईल. अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. वारसाहक्काने आर्थिक लाभ होऊ शकतात. कर्जप्रकरणे मंजूर होतील. जमाखर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल. सामाजिक क्षेत्रातून आपणांस विशेष लाभ होतील. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. शुभदिनांक १५, १६.
आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. चांगल्या विचारांचा आपल्यावर पगडा बसल्याने आपले जीवन सुकर होण्यास अतिशय मदत होईल. कामातील आत्मविश्‍वास व मनोबल उत्तम राहील. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर असामान्य शक्तीची साथ मिळेल. आणि त्याच जोरावर आपले वाजवी ध्येय साध्य करु शकाल. आपल्या जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. जनसंपर्कातून सतत लाभ होतील. मह.त्वाचे निर्णय यशस्वी करुन दाखवाल. नव्या जोमाने कामाला लागाल. व्यावसायिक करार होतील. आपली मते ठाम ठेवलीत व प्रत्येक पाऊल सावधतेने उचलले. तर त्याचा आपल्याला त्रास होणार नाही आणि आशेचा नवीन किरण दिसेल. शुभदिनांक १३, १४.
प्रॉपट्रीच्या व्यवहारातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. कोणताही निर्णय घेताना सल्ला घ्यावा. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. आर्थिक आवक राहील. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता नवीन खरेदीचे बेत आखाल. व्यवसायात नवा उत्साह वाटेल. प्रयत्न केल्यास जुनी येणी वसूल होतील. सार्वजनिक कामात पतप्रतिष्ठा लाभेल. नोकरीतील दैनंदिन कामे सुरळीत पार पडल्याने समाधानकारक स्थिती राहील, तणावाचे वातावरण दूर होईल. व्यवसायात नवीन योजना राबवू शकाल. अनेक कामातून सफलता मिळणार आहे. समाजात व कुटुंबात आपल्या मतांचा योग्य आदर केला जाईल. प्रगतिपथावरील आपली घोडदौड यशदायी ठरेल. शुभदिनांक १५, १६.
आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण होत आहे. सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. त्यातूनच समाजात नांवलौकिक वाढेल. घरातील दुर्लक्षित कामांना वेळ देता येईल. घरातील सुखसुविधा वाढविण्याकडे विशेष लक्ष द्याल. नवीन खरेदीचे बेत आखले जातील. वरिष्ठांच्या आ™ोनुसार वागलात तर एखादी सवलत निश्‍चित मिळेल. वैयक्तिक कारणानिमित्त प्रवास घडून येतील. करमणुकींच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. आपले आशावादी धोरण आपणांस लाभदायक ठरणारे राहील.जुने आजार डोकेवर काढण्याची शक्यता आहे. संततीस उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणार्‍यांना यश मिळेल. मनस्वास्थ लाभेल. शुभदिनांक १६, १७.
आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. भविष्यकाळाच्यादृष्टीने मोठय़ाप्रमाणात आर्थिक तजवीज करणे सहज शक्य होईल. आर्थिक क्षेत्रातील निर्णय योग्य ठरणार आहेत. भावंडांचा एखादा सल्ला लाखमोलाचा ठरेल. कुटुंबातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. नव्या जोमाने कामाला लागाल. उत्साह व उमेद वाढेल. बौद्धीक व कला क्षेत्रातून चांगला फायदा होईल. व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी करत असलेल्या आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. मित्रपरिवाराचे सहकार्यामुळे आपल्या रेंगाळलेल्या कामांना गती येईल. आपल्या इच्छा कृतीत येतील. तीर्थस्थळांना भेटी द्याल. धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती साधाल. शुभदिनांक १३, १४.
आपल्याच राशीतून होणारे चंद्रभ्रमण आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी देणारे राहील. सकारात्मक विचारांचा फायदा होईल. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. व्यवसायात जवळच्या नातेवाईकांना सहभागी करून घेणे शक्य असेल तर जरूर करा. नव्या कामाचा प्रस्ताव येईल. कामाच्या पद्घतीत केलेला थोडासा बदल करावा सुखावह वाटेल. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन खरेदीचे मनसुबे महिला आखतील. गृहसौख्याचा आनंद लुटाल. स्थावर मालमत्तेचे व्यवहार मार्गी लागतील. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटीतून आनंद मिळवाल. कुटुंबियांवर आपली मते लादू नका. सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान लाभेल. नवीन परिचयातून लाभ होतील. शुभदिनांक १३, १४.
आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मनाचा उत्साह कमी पडण्याची शक्यता आहे. व्यवसायात ील अडचणींना तोंड द्यावे लागेल. त्यामुळे नवीन उपक्रम राबविणे पुढे ढकलावे. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला लाख मोलाचा ठरेल. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागतील. कार्यक्षेत्रातील प्रशिक्षणाच्या निमित्ताने परदेशी संस्थांशी संबंध येतील. समाजात आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत रहाल. आपल्या मतांचा आदर होईल. कौटुंबिक शुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वत:चे प्रयत्न स्वत:च करावेत. शुभदिनांक १६, १७.
लाभस्थानातून होणार्‍या चंद्रभ्रमणामुळे भविष्यकाळाच्यादृष्टीने आर्थिक तजवीज करणे शक्य होईल. मोठी आर्थिक उलाढाल केली जाईल. आपण आव्हानात्मक कामे स्वीकारुन यशस्वी करुन दाखविणार आहात. आशावादी धोरण स्वीकारा. आपले अचूक अंदाज व योग्य व्यक्तींकडून मिळणारी मदत यामुळे आपली निकड भागणार आहे. मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल. मोठय़ा व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणार्‍या घटना घडतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. पैसा कमवण्यासाठी कठोर परिश्रम करण्यापेक्षा आपल्या बुद्धीमत्तेचा उपयोग करुन घ्यावा. सुयोग्य विचार आपणांस शक्ती देतील. नवीन कल्पना आकार घेतील. सतत शुभशकुनांचा सतत प्रत्यय येईल. शुभदिनांक १८, १९.
आपल्या राशीच्या दशमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना सुसंधी लाभतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.व्यवसाय उद्योगात केलेले नवीन धाडस यशस्वी होईल. उधारी, उसनवारी वसूल होईल. राजकीय क्षेत्रातील तरुण मंडळींना चांगल्या संधी, नवीन जबाबदार्‍या मिळतील. प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल. प्रसंगनिष्ठ राहून आपले काम साधून घेण्यात आपल्याला यश लाभणार आहे. उद्योग व्यापारात महत्वाचे काम करुन घेता येईल. नवीन ओळखींचा फायदा होईल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. संपूर्ण चौकशी केल्याशिवाय कोणताही महत्त्वाचा निर्णय घेवू नये. एखादा निर्णय आपण झटपट घेऊ शकणार नाही. त्याला विलंब लागेल व अविचारांची दिशा बदलावी लागेल. शुभदिनांक १४, १५.
आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नवनवीन कल्पना आकार घेतील. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. हातून सत्कर्म घडेल. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने नवीन ओळखींचा फायदा करुन घ्याल. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणारे, इमारत बांधकाम व्यवसायात असणार्‍यांना चांगल्या संधी येतील. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. थोरा-मोठय़ांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्जप्रकरणे मंजूर होतील. बढती -बदलीसाठी नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश येईल. आपल्या इच्छा कृतीत येतील. शुभदिनांक १५, १६.
आपल्या राशीच्या अष्टमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. त्यामुळे अंधश्रद्धेला बळी पडू नका. कोणाकडूनही मदतीची अपेक्षा ठेवू नका. स्वावलंबी राहा. खोट्या गोष्टी कानी आल्याने संताप होईल. महत्त्वाच्या निर्णयात आपला पुढाकार व सल्ला उपयोगी पडेल. विश्‍वासाच्या जोरावर मोठे ध्येय गाठाल.उत्साहवर्धक घटना घडल्याने तरुण-तरुणी आनंदात राहतील. नवीन ओळखी होतील.धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येतील. नवीन कार्यारंभ करण्याचा उत्साह निर्माण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. लेखक, साहित्यीक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील.आपल्या वाक्चातुर्य़ाने दुसर्‍यांची मने जिंकून ध्येयपूर्ती कराल. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. उंचीवस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. शुभदिनांक १६, १७.
आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण जोडीदाराचा उत्कर्ष करणारे राहील. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. जनसंपर्कातून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्‍वास व मनोबल उत्तम राहील.व्यवसायातील कामाचा वेग वाढेल. भागीदारी व्यवसायातून चांगले उपक्रम राबविता येतील. सहकार्‍यांचे चांगले सहाय्य लाभेल. कामानिमित्त दूरचे प्रवास ठरतील. कल्पनाशक्तीला वाव देणार्‍या घटना घडतील. सरकारी कामात योग्य प्रगती होईल. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. अंध:श्रद्धेला बळी पडू नका. प्रतिस्पध्र्याची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. त्यातूनच समाजात नांवलौकिक वाढेल. शुभदिनांक १९.